• Wed. Aug 13th, 2025

“काहीतरी घडलंय, पण भितीपोटी कोणी सांगणार नाही”; दाऊदच्या विषप्रयोगाच्या ….

Byjantaadmin

Dec 18, 2023

1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड आणि (Dawood Ibrahim) सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दाऊदवर विषप्रयोग केल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे. एवढंच नाहीतर, दाऊदची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचंही बोललं जात आहे. पण, यामध्ये नेमकं खरं काय? दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? नक्की खरं काय? दाऊदची प्रकृती खरंच चिंताजनक आहे? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. अशातच एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. एकीकडे  (Pakistan) सरकार हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार आरजू काझमी यांनी दाऊदला विष दिल्याच्या चर्चंना दुजोरा दिला आहे. त्यामुळेच तिथे इंटरनेटही बंद करण्यात आलं असून दाऊदवर कराचीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरजू काझमी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानच्या ज्येष्ठ पत्रकार आरजू काझमी म्हणाल्या की, “दाऊद इब्राहिमला कोणीतरी विषप्रयोग केल्याचं ऐकलं आहे. त्याची प्रकृती खूपच खालावली असून प्रकृती चिंताजनक आहे. दाऊदला कराचीतील कोणत्यातरी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल हो असून, हे कितपत खरं आहे, हे सध्यातरी कळू शकलेलं नाही.”

काहीतरी घडलंय, पण भितीपोटी कोणी काहीच बोलत नाही : ज्येष्ठ पत्रकार आरजू काझमी

काहीतरी घडलंय, पण भितीपोटी कोणी काहीच बोलत नाही. भितीमुळे कोणी खरं काय ते सांगणार नाही, असं आरजू काझमी म्हणाल्या. कोण खंर सांगेल? कारण तुम्हालाही माहिती आहे की, कोणीही खरं सांगितलं किंवा कोणाचं नाव घेतलं, तर त्याची काय अवस्था होईल, असंही आरजू काझमी म्हणाल्या.

ट्विटर, युट्यूब आणि गुगल, सगळं सगळं ठप्प 

ज्येष्ठ पत्रकार आरजू काझमी म्हणाल्या की, खरोखर या सर्व गोष्टींमुळे खरंच काहीतरी घडलंय हा संशय अधिक बळावतो. पाकिस्तानात सध्या ट्विटर, गुगल यांसारख्या सोशल मीडिया साईट्स पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे सत्य बाहेरच येत नाहीये. आरजू पुढे बोलताना म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये ना ट्विटर उघडत आहे, ना गुगल सेवा सुरू आहेत ना यूट्यूब चॅनेल कार्यरत आहेत. या सर्व सेवा अचानक बंद का झाल्या? काहीतरी नक्कीच गडबड आहे. नक्कीच काहीतरी लपवलं जात आहे. हे सर्व अचानक घडू शकत नाही.

दोन दिवसांपासून दाऊद रुग्णालयात

दाऊद इब्राहिम दोन दिवसांपासून कराचीच्या रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात रात्रभर इंटरनेट बंद करण्यात आलं आणि दाऊदला कडेकोट सुरक्षेत रुग्णालयात नेण्यात आलं. दाऊदबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. यातील एक दावा असा आहे की, ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे, त्या रुग्णालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, ज्या हॉस्पिटलमध्ये दाऊदला ठेवण्यात आलं आहे, तो मजला पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. त्या मजल्यावर दाऊदचे कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कोणालाच प्रवेश दिला जात नाही. मात्र, या सर्व दाव्यांबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *