• Wed. Aug 13th, 2025

निलंगा शहरात विकास संकल्प यात्रा रथातून साकारल्या केंद्र सरकारच्या योजना

Byjantaadmin

Dec 18, 2023
निलंगा शहरात विकास संकल्प यात्रा रथातून साकारल्या केंद्र सरकारच्या योजना
निलंगा: भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही विकासाच्या मूळ प्रवाहापासून वंचित असलेल्या समाजातील शेवटच्या  घटकाला न्याय देऊन विविध विकास योजनांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य 2014 पासून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने केलेले आहेत त्यांनी  केलेल्या कार्याचा व त्याचा झालेला परिणाम याचा लेखाजोखा निलंगा शहरात विकास संकल्प यात्रा रथाच्या  चित्रफितीच्या माध्यमातून समाजासमोर  मांडण्याचे कार्य निलंगा नगर पालिका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून मांडण्यात आला
यावेळी निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे नगर पालिका अभियंता कैलास वारद,वैद्यकीय अधिकारी डॉ दिनकर पाटील ,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,इरफान सय्यद,मनोज कोळे ,शाफिक सौदागर ,पिंटू पाटील ,सुमित इनानी, वैभव पाटील,किशोर जाधव,तम्मा माडीबोने,हसन चाऊस,शिसेनेचे सुधीर पाटील ,भगवान जाधव, फारूक शेख आदी मान्यवर उपस्थित होते,
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून 9 वर्षात केलेल्या कामाची माहिती देताना केंद्र सरकारच्या योजने पासून योग्य लाभार्थी  शेवटचा घटक वंचीत राहू नये त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माहिती दिली यात ,  थंडी ऊन वारा यापासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने आज तागायत चार कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना साधा निवाराही मिळाला नव्हता अशा सर्व समाजाला  चार कोटी कुटुंबांना मजबूत घरे दहा कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना स्वस्त दरामध्ये गॅस सिलेंडरचे वाटप, देशामध्ये गरिबीचे प्रमाण दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळे आरोग्याच्या उपचारासाठी आर्थिक अडचणी येणाऱ्या व इतर सर्व 55 कोटी पेक्षा जास्त लोकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत 80 कोटी पेक्षा जास्त जनतेला अन्नधान्य मोफत वैद्यकीय उपचारासाठी 75 टक्के कमी किमतीमध्ये औषध उपलब्ध करून देणे सुकन्या समृद्धी योजना, जनधन खाते, सर्वसामान्यांसाठी निर्माण करणे गाव गाड्यातील 18 पगड बलुतेदारांना विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभा करणे अशा अनेक योजना नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये सुरुवात झाल्या व ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या त्यामुळे गेल्या साडेनऊ वर्षांमध्ये साडेतेरा कोटीपेक्षा जास्त कुटुंबे हे डीआरडी रेषेच्या  बाहेर पडली व ती स्वतंत्र झाली अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा सर्वांगीण विकास पाणी रस्ते उद्योगधंदे वीज संरक्षणामध्ये स्वावलंबन अशा अनेक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न केले जात आहेत. त्याचा लेखाजोखा या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे.
 हा कार्यक्रम अतिशय सुनियोजित पणे निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौक निलंगा येथे संपन्न झाला त्या कार्यक्रमासाठी निलंगा शहरातील सर्व शासकीय योजनेचे लाभार्थी माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांनी देशाची यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणाची स्तुती करून त्यांच्यामुळे त्यांच्या धोरणामुळे मिळालेल्या योजनेचा आम्ही उपभोग घेत आहोत त्याबद्दल सर्व लाभार्थींनी माता-भगिनींनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *