गेल्या महिन्यात पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवा नंतर काँग्रेस आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने 21 डिसेंबरला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.या बैठकीत काँग्रेस 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करू शकते आणि भाजपशी टक्कर देण्यासाठी रणनीती बनवू शकते. पाच पैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेस पुढे लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण, इंडिया आघाडीत समाविष्ट असलेले इतर पक्ष आता राज्यांमध्ये जास्त जागांची मागणी करू शकतात.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर कॉग्रेसची बैठक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कॉग्रेसची बैठक बोलावली आहे. ही बैठकAICC कमिटीच्या मुख्यालयात होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १९ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक ही आयोजित केली जाणार आहे.