• Thu. Aug 7th, 2025

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री साखर कारखान्याच्या संचालकांची,मांजर साखर कारखाना येथे भेट

Byjantaadmin

Dec 13, 2023

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री साखर कारखान्याच्या संचालकांची,मांजर साखर कारखाना येथे भेट

शंभर टक्के मशीनद्वारे ऊसाची तोडणी कामाची घेतली माहिती

लातूर :– यशवंत नगर ता. कराड जि.सातारा येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने दिनांक १३/ १२/ २०२३ रोजी विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे भेट देऊन कारखान्या मार्फत गळीत हंगाम २०२३-२०२४मध्ये १००% ऊस तोडणी यंत्राद्वारे होत असलेल्या ऊस तोडीची माहिती व त्याचे नियोजन जाणून घेतले.

लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी यशस्वीपणे वाटचाल करत आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या दुरदृष्टीच्या विचारातून ऊस तोडणी यंत्राद्वारे उसाची तोडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय  शेतक-यांसाठी खूप हितकारक ठरला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या निर्णयामुळे मिळाला आहे. मशीन द्वारे उसाची तोडणी तत्पर्तने होत असल्याने वेळेवर गाळपासाठी ऊस कारखान्याकडे जाऊ लागला आहे. काही वर्षांपूर्वी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला होता त्यातच ऊस तोड मजुरांची संख्या अपुरी असल्याने प्रचंड मानसिक त्रासाला सर्वांना सामोरे जावे लागत होते. ही परस्थिती भविष्यात निर्माण होवू नये यासाठी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांनी ऊस तोडणी यंत्र वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. यासाठी सर्वतोपरी मदत ऊस तोडणी यंत्र खरेदी धारकानां देण्यात आली. तो निर्णय किती योग्य होता हे सध्याच्या हंगामात दिसून येत आहे.

मांजरा साखर कारखान्यात १००% टक्के ऊस तोडणी यंत्राचा वापर करून तोडणी केली जात आहे.या अनुषंगाने सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक मंडळातील सदस्यांनी मांजरा कारखाना येथे प्रत्यक्ष भेट देऊन शंभर टक्के मशीनद्वारे कशा पद्धतीने ऊसाची तोडणी केली जाते याची माहिती जाणून घेतली व या कार्याचे कौतुक केले. सरकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदारी सक्षमपणे चालत असल्याचे भावना व्यक्त करून शिस्टमळातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वश्री संजय कुंभार, कांतीलाल भोसले, वसंतराव कणसे, संतोष घाडगे, संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, बजरंग पवार, दत्तात्रय जाधव, रामचंद्र पाटील, लहू जाधव, रामदास पवार, सुरज उदुगडे, माणिकराव पाटील, एस जी चव्हाण, जयवंत थोरात, सर्जेराव खंडाईत, संग्रामसिंह पाटील, मानसिंगराव जगदाळे, अविनाश माने, लक्ष्मी गायकवाड, संभाजीराव गायकवाड, शारदा पाटील, हनुमंत पाटील आदींची या शिष्टमंडळात उपस्थिती होती.
सर्व सदस्यांनी मांजरा कारखाना येथील लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी कारखान्याच्या वतीने मांजरा कारखाना संचालकांनी मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *