मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांच्या अमरन उपोषणाचा औचित्याचा मुद्दा विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव यांनी मांडला
नागपूर / लातूर प्रतिनिधी : मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरन उपोषणास बसले असल्याचा औचित्याचा मुद्दा आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी उपस्थित केला. लहुजी सेना लातूरचे अध्यक्ष अंगद श्री वाघमारे यांच्या लातूर येथील उपोषणाचा सहावा दिवस असून त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळाली आहे, असे सभागृहात सांगून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तातडीने मातंग समाजाच्या मागण्याच्या संदर्भाने लक्ष घालून सदरील उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी केली.