• Thu. May 1st, 2025

निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Byjantaadmin

Dec 13, 2023
निलंगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
निलंगा:- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस शासकीय रुग्णालय निलंगा फळवाटप व वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे विधानसभा अध्यक्ष तथा शरद पवार विचार मंच चे तालुकाध्यक्ष सुधीरदादा मसलगे,शहराध्यक्ष इस्माईल लदाफ,जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव,विलास माने,महादेवीताई पाटील ,इंजि.विनायकआण्णा बगदुरे,महिला आघाडीच्या, मुनाबी शेख,सौ.वंदना सोळुंके,सौ.कोमल देशपांडे,नंदाबाई पाटील,ईफरोज शेख,मोहन माने,युवक चे महेश चव्हाण,संदीप मोरे, अली बाबा,मुश्ताक बागबान,विकास ढेरे,बालाजी जोडतल्ले,समद लालटेकडे, मा.सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,सुरेश रोळे,बैजनाथ चोपणे व तसेच मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यासह रुग्णालय अधिकारी, कर्मचारी यांनीही मोलाची साथ दिली त्याबद्दल युवक चे महेश चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *