• Wed. Apr 30th, 2025

निलंगा तालुक्यातील केळगावमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Dec 13, 2023

निलंगा तालुक्यातील केळगावमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर, (जिमाका) : विकसीत भारत संकल्प यात्रा निलंगा तालुक्यातील केळगाव ग्रामपंचायतीमध्ये पोहचली. ग्रामस्थानी यात्रेचे स्वागत करून मोठ्या संख्येनी उपस्थित राहून शासनाच्या योजनेची माहिती घेतली. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले. तालुका स्तरावरील अधिकारी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय, केळगाव येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा ‘ पोहचल्यानंतर यात्रेचे उद्घाटन निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपान अकेले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहायक गट विकास अधिकारी श्री. आडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती, सरपंच सौ कोंडाबाई कांबळे, उपसरपंच श्री सुधाकर चव्हाण, वैभव पाटील, धोंडीराम चव्हाण, समिंदर काळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.गोरे मॅडम, ग्राम विकास अधिकारी श्री शेळके सर,जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री भंडारे सर, सर्व सहशिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, आशा ताई, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *