• Wed. Apr 30th, 2025

खिशात पैसे नाही, तरी करा एसटीने प्रवास, कसे होणार शक्य

Byjantaadmin

Dec 13, 2023

महाराष्ट्रात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रत्येक शहरच नाही तर गावही जोडले गेले आहे. गाव तेथेstअशी घोषणाच महामंडळाने केली होती. ग्रामीण भागात एसटीचा मोठा आधार प्रवाशांना आहे. आता परिवहन महामंडळ काळाप्रमाणे बदलत आहे. नवीन नवीन सुविधा एसटीत दिल्या जात आहे. एसटी महामंडळाने मोठ्या शहरामध्ये स्लीपर कोच बसेस सुरु केल्या आहेत. नवीन बसेसची खरेदी होत आहे. आता महामंडळ डिजिटल सुद्धा झाले आहे. म्हणजेच तुमच्या खिशात पैसे नसताना एसटीने प्रवास करत येणार आहे. एसटीने तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे सुट्या पैशांची कटकट संपणार आहे.

काय आहे नेमकी सुविधा

ऑनलाईनचा जमाना आला आहे. खिशात पैसे नसताना खरेदी करता येते. खिशात पैसे नसताना रेल्वे प्रवास किंवा खासगी बसने प्रवास करत येतो. आता एसटी महामंडळानेही ही सुविधा दिली आहे. एसटी बसमध्ये आता क्यूआर कोडची सुविधा सुरु करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट काढून बस प्रवास करता येणार आहे. पुणे विभागात ही सुविधा सुरु झाली आहे. पुणे शहरात यापूर्वीच पीएमपीएमएलने ही सुविधा सुरु केली होती. पुणे विभागात १८ ते २० हजार पेमेंट ऑनलाईनच्या माध्यमातून जमा होऊ लागल्याची माहिती शिवाजीनगर विभागाचे आगार प्रमुख ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली. पुणे विभागातील १४ आगारांत ही सुविधा सुरू झाली आहे.

कार्ड स्वॅप करुन तिकीट काढा

अनेक जण आता खिशात पैसे ठेवत नाही. परंतु डिजिटल पेमेंटचे पर्याय ठेवतात. बँकेचे कार्ड किंवा मोबाईलने पेमेंट करतात. त्यामुळे एसटी महामंडळानेही तिकिटासाठीही ऑनलाइन पेमेंट देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता कार्ड स्वॅप करुन तिकीट देण्याची पद्धत लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात सुट्या पैशांवरुन होणार वादही टळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed