हाडगा पाझर तलावाचे होणार पुनर्जीवन आ.निलंगेकर यांच्या प्रयत्नाला यश तात्काळ काम चालू पिण्याच्या पाण्यासोबतच शेकडो हेक्टर जमीन येणार ओलिताखाली
निलंगा-गेल्या दिड वर्षापूर्वी या भागात अतिवृष्टी होऊन पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावाच्या पाळूला गळती लागली होती व पाळूची वरची बाजू पूर्णपणे खचून गेली होती.त्यामुळे पाळूला मोठ्या भेगा पडल्यामुळे तलावाची धोकादायक परिस्थिती पाहून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी तात्काळ पाटबंधारे विभागाला सुचना केल्या व सांढव्याद्वारे पाणी काढल्याने आजूबाजूच्या गावाला होणारा मोठा अनर्थ टळला होता.गावच्या पिण्याचे व शेतीचे सिंचनाचा विचार करून माजी मंत्रीआमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करून तात्काळ प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली.
या तलावाच्या कामास तात्काळ सुरू केलेल्या कामामुळे या भागातील ३५९ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून संपूर्ण प्रकल्पाची पाळू नविन तयार करण्यात येणार असून संबंधित विभागाकडून त्यांच्या कार्यालयाकडे असलेल्या मशीद्वारे हे काम पूर्ण करण्यात येत आहे.यामुळे हाडगा,उमरगा,वडगाव,शिवणी (को)शिंदिजवळगा या गावच्या शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
त्या अनुशंगाने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या शासन, प्रशासन पाठपुरामुळे संबंधित तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले
यावेळी भाजपाचे निलंगा विधानसभा प्रभारी दगडू साळुंके , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, संपत पाटील जलसंपदा लाभक्षेत्र विभाग कार्यकारी अभियंता अमरशिंह पाटील उपअभियंता आर .के.पाटील. सहाय्यक अभियंता दत्ता कोल्हे ,अभियंता अजय जोजारे, आर.आर ,शिंदे योगेश बिराजदार, उदय भोसले , आदी जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी तर हाडगा गावचे परशुराम वाघमारे, कुमार दरेकर, उत्तम लासूणे, योगेश्वर वाघमारे, गहिनीनाथ किल्लारे, राम होगाडे,आशीष वाघमारे, ज्ञानेश्वर नरवटे, किशन कुलकर्णी,सलिम शेख, केदार मोरे, प्रकाश वाघमारे, इंद्रजीत वाघमारे, सतिश स्वामी,नागरिक उपस्थित होते.