मराठा आरक्षण मिळविणारच- निलंग्यातील सभेत मनोज जारांगे पाटील यांचा एल्गार
निलंगा (प्रतिनिधी):-कोणत्याही परिस्थितीत राज्य शासनाच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेऊच, शिवाय गेल्या ७० वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाच्या फसवणुकीचा बॅकलॉगही भरून काढणार, असा निर्धार मराठा योध्या मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखविला.
निलंगा येथे शनिवारी रात्री आयोजित गरजवंत मराठ्यांचा लढा या कार्यक्रमात ते बालत होते. १८०५ पासून ते १९६७ ते २०२३ पर्यंत मराठांच्या नोंदी सापडल्या, मात्र, त्या सापडू दिल्या नाहीत. कोणत्या नेत्यांनी झाकून ठेवल्या, याचा शोध घेणं गरजेचे आहे. दिलेले आरक्षण कोणत्या निकषावर दिले. १९९० ला ओबीसीना १४ टक्के आरक्षण देण्यात आल, त्यानंतर ४ वर्षांनी म्हणजे १९९४ ला हेच आरक्षण 27 टक्क्यांवर घेऊन जाण्यात आले. गासाठी कोणता निकष वापरला व कुठल्या जनगणनेचा आधार घेतला, असा सवाल उपस्थित केला. खरे तर १९३१ च्या ब्रिटिश जनगणनेनुसार नोंदी उचलून ते व्ही. पी. सिंग सरकारच्या पुढे ठेवण्यात आले व नोंदी न घेताच आरक्षण देण्यात आले, शेतकरी रात्रदिवस कष्ट करून पोटाला चिमटा देऊन लेकरांना शिकवता, मात्र एका एका मार्कामुळे मराठा युवक घराकडे निराश होऊन परततो, यात त्या युवकाचा समाजाचा व आई-वडिलांचा काय दोष, असा सवाल करत या लढ्यात सर्वांनी एकजुटीने माझ्या खांद्याला खांदा लावून आरक्षण पदरात पाडून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले. आरक्षण नसल्याने पिढनपिढ्या बरबाद होत आहेत, याची जाणीव प्रत्येक मराठा समाजाला व्हायला हवी,. आरक्षणाकडे गांभीर्याने पाहा, तरच आरक्षण पदरात पडेल असेही ते म्हणाले, मला माझ्या समाजाची जाणीव आहे ही सभा नाही आणि मी सभा मानत नाही. हे केवळ हक्कासाठी न्याय मिळण्यासाठीची लढाई आहे. आपण आरक्षण तर मिळवूच, पात्र, मराठ्यांनी आत्महत्या करू नये, अशी विनंती यांनी केली. काही राजकीय लोक ओबीसी-मराठा यांच्यात वाद पेटवू पहात आहेत, असा आरोप त्यांनी केला.