• Tue. Apr 29th, 2025

“भाऊबीज” या नवीन मराठी लघुपटाचे चित्रीकरण संपन्न. भाऊबीजेच्या पवित्र दिवशी यूट्यूब वाहिनीवर होणार प्रसारण

Byjantaadmin

Nov 8, 2023
“भाऊबीज” या नवीन मराठी लघुपटाचे चित्रीकरण संपन्न. भाऊबीजेच्या पवित्र दिवशी यूट्यूब वाहिनीवर होणार प्रसारण
मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ  तिरपणकर)”आर्यारवी एंटरटेनमेंट” प्रस्तुत, गौरव जयवंत पाटील निर्मित, महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित, दिग्दर्शित “भाऊबीज” या नवीन मराठी लघुपटाचे चित्रीकरण नुकतंच मुंबईत दादर येथील कोहिनूर मिल कंपाउंड, मोहन नाईक सोसायटी, आणि रे रोड येथे संपन्न झालं. भाऊ- बहिणीच्या अतूट नात्याचे दर्शन घडविणारी कौटुंबिक अशी ही प्रेमळ कहाणी नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडेल इतकंच नव्हे तर रसिक प्रेक्षकांना या लघुपटाचे प्रसारण ऐन दिवाळीच्या सणात भाऊबीजेच्या पवित्र दिवशी यूट्यूब वाहिनीवर पाहायला मिळेल अशी ग्वाही दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी दिली आहे. या लघुपटात गौरव जयवंत पाटील, प्रणाली निमजे, लक्ष्मी गुप्ता, गुरुनाथ तिरपणकर आणि सुनिल पाटेकर यांनी आपल्या महत्वपूर्ण भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या लघुपटाला प्रविण गिरकर यांची रंगभूषा लाभली असुन राजवीर जाधव यांनी संगीत साज चढवला आहे तर संकलनाची जमेची बाजू श्रवंश स्टुडिओ यांनी साकारली असुन अमर सुनिल पारखे यांनी महत्वपूर्ण अशी प्रकाशयोजना आणि छायाचित्रणाची बाजू सावरली आहे. या लघुपटासाठी प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगांवकर, सुरेश तिर्लोटकर, सायली तिर्लोटकर आणि लक्ष्मी मनिष गुप्ता यांचे विशेष योगदान लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed