हरंगूळ ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार
काँग्रेस पॅनल प्रमुख व मान्यवरांची उपस्थिती
लातूर -लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बु.येथील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित जनहित विकास पॅनल चे सरपंच व सदस्य निवडून आलेले असून मंगळवारी नवनिर्वाचित सरपंच सौ शीतल झुंजारे व ग्रामपंचायत सदस्य यांनी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना बंगल्यावर भेट घेतली व आशिर्वाद घेतला यावेळी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना शुभेछा दिल्या.
यावेळी विलास साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र सुडे, मांजरा साखर कारखान्याचे संचालक सूर्यकांत पाटील,तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके उपाध्यक्ष दयानंद बिडवे, हरंगूळ येथील नवनिर्वाचित सरपंच सौ शीतल झुंजारे, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर झुंजारे, अमोल आयलाने, दीपा उटगे, शिवनंदा वाघमारे,राजकुमार बुधे, रसिका ढवारे, कालींदा कांबळे, संतोष शेळके, विनायक कांबळे, ज्योती राठोड यांच्यासह हरंगुळ येथील हरी पनाळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते