• Tue. Apr 29th, 2025

मॅक्सवेल याच द्विशतक अन् शरद पवार यांचा पावसातील फोटो…

Byjantaadmin

Nov 8, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे. शरद पवार यांची साथ सोडत ते भाजप आणि शिवसेनेसोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरे केले. शरद पवार गटाकडे आमदारांची संख्या जवळपास १५ राहिली असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवार गटाची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रोहितpawar  यांनी एक टि्वट केले आहे. शरद पवार यांची पावसातील सभा आणि ग्लेन मॅक्सवेल याच द्विशतक याचा संबंध रोहित पवार याने जोडला आहे. त्या ट्विटची क्रिकेट आणि राजकारणात चांगली चर्चा सुरु झाली आहे. अनेक युजरकडून यासंदर्भात कॉमेंट करण्यात आल्या आहेत.

 

मॅक्सवेल याच द्विशतक अन् शरद पवार यांचा पावसातील फोटो...रोहित पवार याचं ट्विट काय?

काय आहे रोहित पवार यांचे ट्विट

राज्यातील परिस्थितीनंतर रोहित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, परिस्थिती कितीही विरोधात असली आणि मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागते. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते… मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं..या ट्विटला दोन्ही बाजूंनी युजरने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी टीक केली असून काही समर्थन दिले आहे.

 

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा सुरू होणार

मराठा आरक्षणामुळे नेत्यांना गावबंदी होती. त्यामुळे रोहित पवार यांना त्यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित करावी लागली होती. ही यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आज रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. हिवाळी अधिवेशनवर युवा संघर्ष यात्रा धडकणार असल्याची रणनीती तयार केली जात आहे. संघर्ष यात्रेचा नवीन कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed