काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे चुलत बंधू वरुण गांधी यांनी मंगळवारी केदारनाथ मंदिरात दर्शनानंतर थोडक्यात चर्चा केली. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही भावांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक भेट ही फारशी दिसून आलेली नाही. देशातील प्रमुख राजकीय घराण्यातून असलेल्या दोन्ही चुलत भावांच्या या भेटीने वरुण गांधींच्या राजकीय भवितव्यावरून आता तर्कवितर्क लावले जात आहेत. संजय गांधी आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी हे अलीकडच्या काही काळापासून भाजपच्या प्रमुख बैठकांमध्ये दिसून आलेले नाहीत. अनेक मुद्द्यांवर त्यांची भूमिका ही भाजपच्या भूमिकेशी सुसंगत नाही आणि वेगळी आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलिभीतचे खासदार आहेत.गांधी घराण्यातील दोन्ही भाऊ केदारनाथ मंदिराच्या बाहेर भेटले. त्यांनी एकमेकांचं अभिवादन केलं. आणि दोघांमध्ये थोडा वेळ चर्चाही झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट ‘अतिशय छोटी’ होती. पण या भेटीत मोठा दोन्ही भावांमध्ये मोठा उत्साह दिसून आल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. या भेटीदरम्यान वरुण गांधी यांच्या मुलीला भेटून राहुल गांधी अतिशय आनंदीत होते, असं सूत्रांनी म्हटलं आहे. गांधी घराण्यातील या दोन्ही चुलत भावांची भेट कधी होत नाही. पण त्यांचे संबंध चांगले आहेत. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.rahul gandhi हे गेल्या तीन दिवसांपासून उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये आहेत, तर वरुण गांधी हे मंगळवारी आपल्या कुटुंबासोबत केदारनाथमध्ये दर्शनाला आले.एकीकडे उघडली आहे. दुसरीकडे भाजपचे खासदार असलेले वरुण गांधी हे गेल्या काही काळापासून नाराज आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन असो, की उत्तर प्रदेशातील स्थानिक मुद्दे, वरुण गांधी हे भाजपपासून वेगळी भूमिका घेत आहेत. भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमातही ते दिसत नाहीत. यामुळे लोकसभा निवडणुका पाहता वरुण गांधी काय भूमिका घेता याकडे सर्वांचं लक्ष आहे.