बाजार समितीत एकाच दिवशी सोयाबीनची पाच हजार क्विंटल आवक शेतकऱ्यांची वर्दळ वाढली, भावही ज्यादा
निलंगा, : युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली नूतन संचालक मंडळाने चांगले काम केल्यामुळे शेतकऱ्याची वर्दळ वाढली असून निलंगा व कासार सिरसी बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक आल्याने बाजार समितीच्या आर्थिक उत्पादनात भर पडली आहे नूतन संचालक मंडळाने उत्पन्न वाढीसाठी केलेल्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे दोन्ही बाजार समितीत दहा हजार पोत्याची विक्रमी आवक आली आहे.
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1961 झाली तर कासार सिरसी उपबाजार समितीची स्थापना 1973-74 साली झाली आहे. पण दोन मार्केट कमिटीच्या इतिहासात कधीही एवढी विक्रमी आवक आली नव्हती आज आली आहे,
सोमवार दि .6 सप्टेंबर रोजी बाजार समितीत सोयाबीनला 4800 ते 4975 रुपया पर्यंतचा दर मिळाला आहे.दरम्यान सभापती शिवकुमार चिंचनसुरे व उपसभापती लाला साहेब देशमुख यांनी संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर नियोजन बद्ध पध्दतीने व्यापार वृद्धी वाढविण्यासाठी शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करण्यासाठी व्यापाऱ्या सोबत चर्चा बैठका घेऊन नियोजन केले व कीर्ती, टीना, किसान मित्र ,या सोयाबीन कंपनीचे खरेदीदार या ठिकाणी आणल्यामुळे खरेदी मोठ्या प्रमाणात होत. असल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत आहे .मालाची विक्री झाल्यानंतर रोख स्वरूपात किंमत अदा केली जात आहे यार्डातील सर्व दुकानावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाची जाहीर बोली लावून मालाची खरेदी विक्री केली जात आहे. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष पाटील व त्यांचे कर्मचारी स्वतः बाजार समितीमध्ये जाऊन मालाची खरेदी विक्री पहात आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता आली आहे.त्यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि शेतकरीभिमुख सेवा दिल्यामुळे बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलत आहे. काही दिवसात बाजार समिती कात टाकत आहे.
शिवकुमार चिंचनसुरे : सभापती निलंगा बाजार समिती
निलंगा बाजार समितीमध्ये यापूर्वी शेतकऱ्यांकडून माल विक्रीस आणण्यासाठी धजत नव्हते मात्र युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे जिल्ह्यातील अनेक खरेदीदाराशी संपर्क केला असून थेट प्रत्येक आडत दुकानी जावून सौदा केला त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये भुसार व सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेऊन यावे त्या मालाची योग्य किंमत करून चांगला भाव देऊ खरेदी विक्री साठी निलंगा व कासार सिरसी मार्केट यार्डात सर्व शेतकऱ्यांनी माल घेऊन यावा असे आवाहन सभापती शिवकुमार चिंचनसुरे व उपसभापती लालासाहेब देशमुख यांनी केले आहे,