• Wed. Apr 30th, 2025

काटेवाडीत ‘काटे की टक्कर’…

Byjantaadmin

Nov 5, 2023

बारामती,काटेवाडी काटे की टक्कर आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच भाजपने अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. तर अजित पवार गटाकडून हे आरोप थेट फेटाळून लावण्यात येत आहे. गावातील विकासाच्या मुद्द्यावरदेखील एकमेकांवर निशाणा साधणं सुरु आहे. काटेवाडीत अजित पवारांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे.

काटेवाडी भाजप पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे काय म्हणाले?

पांडुरंग कचरे म्हणाले की,  ही निवडणूक काटेवाडी ग्रामस्थांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. काटेवाडीतील भ्रष्टाचार समोर आहे. गावात अनेक सेवा सुविधा नाही आहे. राष्ट्रवादी काम केल्याचं सांगतात. मात्र नाव मोठे लक्षण खोटे आहे. काटेवाडीत मतं विकायला काढले आहेत. रात्री गाव अडीचशे रुपये विकत घेतले. गावातील अनेक विकास काम झाली नाहीत. अनेक प्रश्न सुटले नाहीत.जनतेच्या प्रश्न समोर आणण्यासाठी निवडणूक आहे.जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढत दिसतआहे,

त्यासोबतच त्यांनी 100 टक्के परिवर्तन होईल सर्व जागा निवडून येईल. काटेवाडीतील लढाई आम्ही जिंकणार, असा दावादेखील त्यांनी केला आहे.  4 हजार लोकांना पैसे वाटले जे विकास कामात खाल्लेले पैसे आहेत.
अजित पवार यांनी समर्थकांना आवरायला हवं, असंही त्यांनी खडसावून सांगितलं आहे.

माजी सरपंच विद्याधर काटेंनी आरोप फेटाळले….

काटेवाडी माजी सरपंच विद्याधर काटे यांनी भाजपचे सगळे आरोप फेटाळले आहे. आम्ही काही पैसे वाटले नाहीत. शिवाय गावातील विकास कामांवरदेखील भार दिल्याचं ते म्हणाले. अजित पवार तब्येतीमुळे मतदानाला उपस्थित राहू शकले नाही. डेंग्यूमुळे अजित पवारांची तब्येत खालावली. त्यांच्या साथीमुळे100 टक्के पूर्ण पॅनल निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed