मंगळागौर स्पर्धेत लातूरचा ‘फन फार्मर्स संघ’ प्रथम
लातूर : परभणी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत लातूरचा ‘फन फार्मर्स संघ’ प्रथम पारितोषिक पटकावला आहे
आदिशक्ती व दीपस्तंभ समुहातर्फे घेण्यात आलेल्या ‘सन्मान स्त्री शक्तीचा, खेळ मंगळागौरीचा’ या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील महिलांचा ‘फन फार्मर्स संघ’ प्रथम क्रमांक पटकावत या संघाने 21 हजार रुपयाची रोख रक्कम जिंकली आहे तर या स्पर्धेचे शुभम बोराडे (मुंबई) व लखन परळीकर (मुंबई) यांनी परिक्षण केले. तर मंगळागौर या या स्पर्धेत 16 संघाने सहभाग घेतला होता तर पुणे जालना नांदेड परभणी अंबाजोगाई परतुर गंगाखेड आदी ठिकाणाहून मंगळागौरी स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने स्पर्धक सहभागी झाले होते
तर विजेत्या संघाला शुभम बोराडे लखन परळीकर आमदार सौ मेघना साकोरे – बोर्डीकर लातूरच्या विजेत्या संघाला सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित केले तर या संघामध्ये स्नेहल आर्वीकर, मधुरा
आर्वीकर, प्राजक्ता देशपांडे, चिन्मयी आर्वीकर, पूजा निगडीकर, स्वाती निगडीकर, तृप्ती जोशी, अपेक्षा आर्वीकर या महिलांच्या ‘फन फार्मर्स’ संघाने ही स्पर्धा जिंकून पुन्हा एकदा लातूरच्या शिरपीचा मानाचा तुरा रवला आहे. तर या स्पर्धेचे सूत्रसंचालन अंगद गरूड व प्राची यांनी केले. आदिशक्ती व दीपस्तंभ समुहाच्या सर्व सदस्यांनी स्पर्धा संपन्न होण्यासाठी उत्कृष्ट अशी प्रयत्न केले. तर मंगळागौरी या स्पर्धेतील विजय स्पर्धकांचे लातूर शहरातील नागरिकांकडून अभिनंदन केली जात आहे तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.