‘महाराष्ट्र’ची कु. रचना हजारे विज्ञान शाखेत स्वा.रा.ती.म. विद्यापीठातून सर्वप्रथम
निलंगा – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी २०२३ मध्ये घेतलेल्या पदवी परीक्षेत विज्ञान शाखेतून कु. हजारे रचना राजेंद्र हिने ९४.६३% गुण मिळवून विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्र महाविद्यालयाची कला, विज्ञान, वाणिज्य, संगणक शास्त्र, बी.व्होक या शाखांचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकत आहेत. ही परंपरा शै. वर्ष २०२२-२३ मध्ये कायम राखत कु. हजारे रचना हिने हे यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, सचिव मा. श्री. बब्रूवानजी सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके, महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. निलंगा परिसरातून कु. रचना हजारे हीच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.