५२ व्या अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषदेसाठी डॉ. कल्याण बरमदे यांची निवड
लातूर : लातूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वंध्यत्व व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांची अमेरिकेतील नॅशविल येथे अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये एका चर्चासत्रामध्ये ते संबोधित करणार आहेत. या परिषदेसाठी ते अमेरिकेला रवाना होत आहेत.
दक्षिण अमेरिकेच्या टेंन्ससी राज्यातील नॅशविल येथे दि. ५ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ही अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक तसेच एंडोस्कोपिक सर्जन संघटना ( AAGL ) ही वैद्यकीय सराव, शिक्षण, संशोधन, नवकल्पना आणि महिलांसाठी आरोग्य सेवेला पुढे नेणारी सर्वात मोठी वैद्यकीय संघटना आहे.या संघटनेच्या वतीने जागतिक स्तरावर महिलांच्या आरोग्य विषयक क्षेत्रात काम करणाऱ्या लॅप्रोस्कोपिक तसेच एंडोस्कोपिक सर्जन्स तज्ज्ञांची परिषद बोलावण्यात आली आहे. या परिषदेत जगभरातील मान्यवर स्त्री रोग तज्ज्ञ, लॅप्रोस्कोपिक तसेच एंडोस्कोपिक सर्जनना पाचारण करण्यात आले आहे. लातूर – मराठवाड्यातून हा बहुमान मागच्या दोन दशकांपासून महिलांना , विशेषतः वंध्यत्व निवारण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. कल्याण बरमदे यांना मिळाला आहे. डॉ. कल्याण बरमदे यांनी सन २००४ पासून स्त्री रोग तसेच वंध्यत्व निवारण क्षेत्रात नेत्रदीपक असे कार्य केले आहे. एक निष्णात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ अशी त्यांची सगळीकडे ओळख आहे. ते भारताच्या लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ असो.चे सचिव तसेच आंतरराष्ट्रीय लॅप्रोस्कोपिक संघटनेचे सन्माननिय सदस्य आहेत. या परिषदेत डॉ. कल्याण बरमदे भारतातील विशेषतः ग्रामीण भागात स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या, त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना याविषयी ते आपले विचार व्यक्त करणार आहेत. एएजीएलचे अध्यक्ष डॉ. अँड्रयू आय. सोकोल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या आग्रहपूर्वक निमंत्रणाचा स्वीकार करून डॉ. कल्याण बरमदे अमेरिकेला रवाना होत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल डॉ. अजय पुनपाळे , डॉ अजय जाधव, डॉ अनिल वळसे, डॉ. संदीपान साबदे , डॉ. रमेश भराटे , डॉ. संजय शिवपुजे, डॉ. ओमप्रकाश भोसले, डॉ. संजय पौळ पाटील, डॉ. राजकुमार दाताळ , डॉ. पवन लड्डा व आयएमएच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
५२ व्या अमेरिकन स्त्री रोग लॅप्रोस्कोपिक परिषदेसाठी डॉ. कल्याण बरमदे यांची निवड
