• Tue. Apr 29th, 2025

ज्येष्ट पत्रकार अय्युब नल्लामंदू  यांची औसा येथील मित्रांशी व ऑर्बिट इंग्लिश स्कूलला सदिच्छा भेट

Byjantaadmin

Nov 2, 2023
ज्येष्ट पत्रकार अय्युब नल्लामंदू  यांची औसा येथील मित्रांशी व ऑर्बिट इंग्लिश स्कूलला सदिच्छा भेट.
औसा- सोलापूरचे प्रसिद्ध साप्ताहिक ” कासिद ” चे मुख्य संपादक अय्युब नल्लामंदू व लेखक प्रा.मजहर अलोळी यांनी औसा येथील मित्रांशी सदिच्छा भेटी घेवून आपले मित्रत्व जपले.परवा सोलापूर येथे प्रसिद्ध पत्रकार “कासिदकार”मरहूम अब्दुल लतिफ नल्लामंदू यांच्या जीवन व कार्यावर आधारित, सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वतीने प्रकाशित दोन पुस्तकांचे प्रकाशन माजी केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. सदरील पुस्तके मराठी,उर्दू,हिंदी भाषेत प्रकाशित झाले आहेत. त्या पुस्तकात औसा येथील पत्रकार   म.मुस्लिम कबीर  यांनी ज्येष्ट पत्रकार मरहूम अब्दुल लतीफ  नल्लामंदू यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख आहेत. संपादक अय्युब नल्लामंदू यांनी ती दोन्ही प्रकाशित पुस्तके, पत्रकार म.मुस्लिम कबीर व पत्रकार अड.इकबाल शेख यांना सप्रेम भेट देवून सत्कार ही केला.
    संपादक अय्युब नल्लामंदू यांनी  येथील ऑर्बिट इंग्लिश स्कूल ला ही सदिच्छा भेट दिली व येथे आधुनिक भाषा विषया बरोबर मूल्य शिक्षण देत असल्याचे बघून समाधान व्यक्त केले व  म्हणाले की या मुळे विद्यार्थी सक्षम विचार व वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवणारे निर्माण होतात. तत्पूर्वी ऑर्बिट इंग्लिश स्कूल चे प्रमुख अड. इक्बाल शेख यांनी पत्रकार अय्युब नाल्लामंदू व प्रा. मझहर अल्लोळी यांचे शाल,पुष्पहार व अड.इकबाल शेख लिखित पुस्तक ” सावली” भेट देवून सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed