G20 व Y-20 चे लातूरात राष्ट्रीय समग्र शिखर परिषदेचे A.C.E च्या माध्यमातून आयोजन
A.C.E व Klass Wise संस्थेच्या मुख्य संचालिका वैष्णवी येरटे यांची माहिती
लातूर/प्रतिनिधीः- विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाची असलेली आणि त्यांच्या सर्वांगिण विकास व बुद्धीमत्तेला अधिकची चालना देण्यासाठी ए.सी.ई च्या माध्यमातून लातूरात राष्ट्रीय समग्र शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही परिषद लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दोन दिवस पार पडणार असून यामध्ये शहरासह लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन Klass Wise संस्थेच्या वैष्णवी येरटे यांनी केले आहे.
G-20 च्या पुढाकारातून संपुर्ण देशात ए.सी.ई च्या माध्यमातून राष्ट्रीय समग्र शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेत शालेय विद्यार्थी, पालक व शाळेचे प्रतिनिधी सहभाग नोंदवत आहेत. या परिषदेत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना हेरून त्यांना त्यासाठी अधिकचे मार्गदर्शन करण्यात येते. विविध क्षेत्रातील मान्यवर व तज्ज्ञाचे याबाबत मार्गदर्शन होणार असून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या परिषदेत विद्यार्थ्यांसाठी एका समग्र चाचणीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विशेष यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यामधील कांही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिखर परिषदेत व G-20 च्या बैठकीत प्रतिनिधित्व करण्याची संधीही प्राप्त होणार आहे. या परिषदेत पालकांसह शाळेच्या प्रतिनिधींनाही सहभाग नोंदविता येणार आहे.
लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि. 8 व 9 नोव्हेंबर असे दोन दिवस ही परिषद पार पडणार आहे. या परिषदेच्या उद्घाटन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर तर विशेष अतिथी म्हणून खा. सुधाकर श्रृंगारे यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास Y-20 चे सचिव अभिषेक मल्होत्रा, शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे, विद्यासागर अॅकॅडमीचे संजय लड्डा यांची उपस्थिती असणार आहे. दुसऱ्या दिवशी दिनांक 9 नोव्हेबर सायंकाळीं निरोप समारंभ व स्टेज इव्हेंट शहरातील बिडवे लाउनस्
या ठिकाणी होणार असुन या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन Y -20 चे सचिव अभिषेक मल्होत्रा असणार आहेत. समग्र परिषदेत लातूर शहरासह जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी, पालक व शाळेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन Klass Wise, A.C..E या संस्थेच्या संचालिका वैष्णवी येरटे यांनी केले आहे.