तात्काळ महावितरणाने विद्युत डीपी केला रस्त्याच्या बाजूला; औरंगपुरा स्थानिकांनी केला अभियंता जाधव यांचा सत्कार
निलंगा:-प्रतिनिधी
निलंगा शहरातील औरंगपुरा भागातील मुख्य विद्युत पुरवठा करणारा विद्युत डी.पी. हा मागील वीस वर्षापासून मुख्य वस्ती अंतर्गत चौकात होता. त्याचा त्रास या भागातील लहान मुलांना रहदारीला व बाजूला असलेल्या शाळकरी मुलांना होत होता.
मात्र या विद्युत डीपीचा धोका पावसाळ्यात निर्माण होत होता. बाजूला शाळा असल्यामुळे अपघाताची भीती नाकारता येत नव्हती त्यामुळे स्थानिक नागरिकांनी व शाळेच्या विनंतीवरून निलंगा विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी दखल घेऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच निलंगा शहर शाखा अभियंता प्रशांत जाधव यांना रस्त्यात आडवा असलेला विद्युत डिपी कडेला घेऊन सरळ करण्याच्या सूचना केल्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी अभियंता प्रशांत जाधव सरांनी पाहणी करून लागलीच दोन दिवसातच रस्त्याच्या मध्ये असलेला विद्युत डीपी रस्त्याच्या बाजूला नागरिकाची समस्या दूर करून गुरुवारी दुपारी विद्युत पुरवठा सुरळीत केला. या कामासाठी या भागातील माजी नगरसेवक हसन चाऊस सतत पाठपुरावा केला होता . या परिसरातील नागरिकांच्या वतीने व शाळेच्या वतीने शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी खुर्रम सय्यद,आसिफ शेख,साजिद खडके,महमद उस्मान शेख,महमद रशीद सय्यद,बबलू सय्यद,वसीम सय्यद, महेमुद झारेकर,शमीम सय्यद ,पठाण हे उपस्थित राहून सत्कार करून आभार व्यक्त केले