मराठा आरक्षणासाठी बोकनगाव येथे साखळी उपोषण व कॅन्डल मार्च
लातूर:–मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण करत असलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी बोकनगाव ता. जि. लातूर मधील मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले असून गावातील तरुण, जेष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांनी एकत्रित येऊन कॅन्डल मार्च काढला.
यावेळी मराठा आरक्षण प्रश्नी वेळकाढूपणा करणा-या राज्य व केंद्र सरकारचा निषेध करून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलनात केली गेली.