निलंगा उपजिल्हाधिकारी यांना आरक्षणाबाबत पुरावे सादर
निलंगा -मराठा व कुणबी ही एकच जात असलेचा उल्लेख असल्याचा पुरावा लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांनी उपविभागीय अधिकारी निलंगा यांना सादर केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या द बॉम्बे सर्व्हे मेन्युअल पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये व द महाराष्ट्र लँड रेवण्ड कोड 1966 या अहवाला मध्ये मराठा व कुणबी ही एकच जात असल्याचा उल्लेख असून त्या अहवालाचे सत्यप्रत निलंगा उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांना लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांनी निवेदणाद्वारे व पुराव्यासह निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती व शासनकडे सादर करण्यात आले
सदरील पुराव्याच्या आधारे सर्व मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे गरजेचे आहे असे मत पंडितराव धुमाळ यांनी व्यक्त केले
निलंगा उपजिल्हाधिकारी यांना आरक्षणाबाबत पुरावे सादर
