• Mon. Apr 28th, 2025

निलंग्याच्या भूमिपुत्र अनिलकुमार गायकवाड यांच्या एकसष्टीनिमित्त अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याकडून शुभेच्छा

Byjantaadmin

Nov 1, 2023

 

निलंग्याच्या भूमिपुत्राने दिल्लीचे तख्त गाठले अनिल कुमार गायकवाड यांच्या एकसष्टीनिमित्त अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याकडून शुभेच्छा

 

निलंगा- निलंगा तालुक्यातील अंबुलगा(पोळ) या गावी कै.बळीराम गायकवाड यांच्या पोटी जन्म घेतलेले माजी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई तथा सह व्यवस्थापकीय-महासंचालक एमएसआरडीचीचे(समृद्धी महामार्ग)यांचा एकसष्टी कार्यक्रम लातूर येथील हॉटेल ग्रँड सरोवर या कार्यक्रमास्थळी श्री.श्री. कालिदास महाराज (हरियाणा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाला पंढरपूर देवस्थानचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, राज्यातील प्रमुख राज्यातील प्रमुख नेते तसेच राजकीय क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब,श्री शैलेश पाटील चाकूरकर साहेब खासदार सुधाकर शृंगारे साहेब,माजी खासदार जी गायकवाड माजी आमदार व बब्रुवानजी खंदाडे तसेच सर्व सामाजिक,राजकीय क्षेत्रात कार्य करणारे पदाधिकारी माजी खासदार सुनील गायकवाड, मातोश्री वत्सलाबाई गायकवाड सौ जयश्रीताई अनिलकुमार गायकवाड व सहपरिवार उपस्थित होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, कैलासवासी बळीराम गायकवाड त्यांचे इवई देविदास गुरधाळे यांचे स्व.निलंगेकर साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. खरं तर बळीरामजी गायकवाड सर यांचे निलंग्यामध्ये नातेसंबंध अत्यंत जवळचे होते. कै. माधवराव सोनकांबळे सर यांच्या असलेले संबंध व त्यांचे पुत्र रमेश सोनकांबळे व अनिलकुमार गायकवाड निलंग्याला शिक्षण घेत असलेले व सुनील गायकवाड हे नात्यापेक्षा मित्रत्वाचे जवळचे संबंध होते. तर देवदास गुरधाळे यांचे व शेषराव कांबळे यांचे पण अति जिव्हाळ्याचे नाते होते. योगायोगाने कै.माधवराव सोनकांबळे व देविदास गुरधाळे हे मामा-भाचे असल्याने अनिल कुमार गायकवाड यांचे व जयश्री यांचा विवाह जुळण्यात कै.माधवराव सोनकांबळे गुरुजी होते. अनिलजी यांचे शिक्षण व बालपण हे अंबुलग्यामध्ये तर सातवी आठवी हे शिक्षण उदगीर,नववी आणि दहावी हे शिक्षण मदनसुरी येथे झाले. त्यांनी कमी वयामध्ये सिव्हिल इंजिनिअर पदविका लातूर येथे पूर्ण केली.वय कमी असल्यामुळे त्यांना दहा ठिकाणीचे नोकरीसाठी ऑर्डर आले असताना त्यांना वयामुळे नोकरी करता आली नाही त्यांनी उमरगा येथे शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केले.त्यानंतर ते वयाच्या 19व्या वर्षी पाटबंधारे विभाग,जायकवाडी येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करू लागले.त्यांचा वाढता आलेख हा वाढतच गेला 1983-84 मध्ये कडा आष्टी येथे काम करीत असताना यांचे लग्न निलंगा येथील देविदास गुरधाळे यांच्या मुलीशी संपन्न झाला. त्यांना एमपीएससी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी त्यांची निलंगा येथे लोवर तेरणामध्ये स्व.निलंगेकर साहेबांनी बदली केली ते एमपीएससी परीक्षेमध्ये पास होऊन उच्च पदावर गेले खरं तर आमच्या भूमिपुत्राने निलंगा तालुक्याची शान आन आणि मान वाढवून निलंग्याच्या मातीचा सुगंध मग दिल्लीचे महाराष्ट्र सदन असो किंवा सि-लिंक असो किंवा समृद्धी महामार्ग असो असा इतिहास विकासाच्या माध्यमातून घडवण्याचा त्यांच्या हातून झाला.याचा आम्हा निलंगावासीयांना सार्थ अभिमान आहे.म्हणून म्हणतो, निलंगाच्या भूमिपुत्रांनी दिल्लीचे तख्त गाठले. यानिमित्त त्यांच्या एकसष्ठी निमित्त मी निलंगा तालुक्याच्या व निलंगेकर परिवाराच्या वतीने त्यांना अभिष्टचिंतन करतो व त्यांचे भावी आयुष्य निरोगी राहावे उज्वल राहावे अशी अपेक्षा करतो असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed