साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा..
निलंगा:-डॉ.अरविंद भातांब्रे यांच्या मार्गदर्शनखाली बोरोळ येथे मोफत मधुमेह रक्तदाब नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिर ठेवण्यात आले होते या शिबिरामध्ये बोरोळ गावातील गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला ,या शिबिरामध्ये 420 रुग्णांनी सहभाग नोंदवला.त्या मध्ये 40 मोतीबिंदू रुग्णांची नोंदणी झाली व 237 रूग्णांना चष्मे लागले.
आज पर्यंत डॉक्टर अरविंद भातांब्रे यांच्याकडून 6100चष्म्याचे वाटप झाले आहे त्याच बरोबर वेगवेगळ्या योजना शिबिरे पार पडत असताना हॉस्पिटलच्या माध्यमातून 75 वर्षांपुढील रुग्णांना मोफत दवाखाना आहे आणि 2ऑक्टोबर पासून महिलांना मोफत तपासणी करण्यात आली आहे.
या वेळी दत्ताभाऊ हुरूचनाले,रामचंद्र बिरादार,दयानंद चाफे,बालाजी सपकाळे,बालाजी येंकुरे,सतीश देवणे, दयानंद रजुळे,अनिल तेलगावे, दत्ता गिरी , मल्लिकार्जुन म्हेत्रे व बोरोळ ग्रामस्थ उपस्थित होते .