सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू
निलंगा- मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे गेली सहा दिवस झाले आमरण उपोषण सुरू आहे,या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.मराठा समाजाला सरसकट ओबीसींमध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी हे आंदोलन महाराष्ट्रातील गावागावात सुरू आहे,जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना आमदार खासदारांना निलंगा शहरात व साखळी उपोषणस्थळी बंदी घालण्यात येणार आली आहे,आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुम्ही आमच्या दारात यायचं नाही असे मत व्यक्त करण्यात आले,तसेच राजकिय पक्षाने निलंगा तालुक्यात राजकीय कार्यक्रम आयोजित करू नयेत अन्यथा ते कार्यक्रम उधळून लावू असा सज्जड इशारा आंदोलनस्थळा वरून देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निलंगा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी उपोषणस्थळी भेट देऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत ही लढाई मिळून लढू असे उद्गार काढले,निलंगा शहरातील सकल मराठा समाज एस. टी. कर्मचारी यांनी सुद्धा या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलन शांततेत होणार असून कुठेही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची काळजी समाज बांधवांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
यावेळी दिलीप धुमाळ,ईश्वर पाटील, चक्रधर शेळके,विशाल जोडदापके, विनोद सोनवणे,प्रमोद कदम, किरण पाटील,राजकुमार साळुंके,हरिभाऊ सगरे,डॉ.उद्धव जाधव,डॉ. नितीश लंबे,डॉ.दत्ता शिंदे,डॉ. सुधीर बिराजदार,पंकज शेळके,विकास नाईकवाडे,भगवान जाधव,इंजि मोहन घोरपडे,बरमदे डी.न,प्रकाश सगरे,ऍड. तिरुपती शिंदे, ऍड. गोपाळ इंगळे,किशोर जाधव,नयन माने,बंटी देशमुख,वैभव गोमसाळे, प्रकाश गोमसाळे,माधव गाडीवान,महेश जाधव, विनोद चोबे, अजित लोभे, विलास लोभे,प्रदीप कदम,किशन मोरे, शत्रुघ्न जाधव,राजेंद्र बोटकुळे, प्रशांत सूर्यवंशी,मंगेश सगरे, नामदेव शिरसल्ले,संतोष घाडगे,आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*