माकणी थोर येथे बेमुदत साखळी उपोषण
निलंगा- मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील माकणी थोर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने काल दी.२९ ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
सुरुवातीला गावभर वाजत गाजत रॅली काढून तरुणांनी मोठ्या घोषणा देत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आमचा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.
सध्या राज्यभर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाची चर्चा देशभर सुरू असून,सर्वच स्तरातून या हक्काच्या आंदोलनाचे स्वागत होताना दिसत आहे .त्याचाच भाग म्हणून गावोगावी राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून,अनेक ठिकाणी उपोषणे सुरू आहेत.या आंदोलनात गावातील उपसरपंच तुकाराम सूर्यवंशी,पोलीस पाटील माधव सूर्यवंशी,देवस्थान कमिटीचे सचिव हणमंत सूर्यवंशी ,माधव बालाजी सूर्यवंशी,दीपक सूर्यवंशी,विजय सूर्यवंशी,राजाराम सूर्यवंशी, ज्ञानोबा सूर्यवंशी,जीवन सूर्यवंशी,हणमंत सूर्यवंशी,बाळासाहेब सूर्यवंशी,संतोष सूर्यवंशी,आत्माराम सूर्यवंशी,पवन सूर्यवंशी,सुधाकर सूर्यवंशी,भिमाशंकर सूर्यवंशी,माधव सूर्यवंशी,शिवाजी आकडे, झटिंग आकडे,जगदीश सूर्यवंशी,दिलीप सूर्यवंशी,सखाराम सूर्यवंशी,बाळू गायकवाड,तानाजी यादव,दिलीप कारभारी,अमोल पाटील,मोहन आकडे,भागवत सूर्यवंशी,श्रीनिवास सूर्यवंशी,नवनाथ सूर्यवंशी,बालाजी सूर्यवंशी,पंडित सूर्यवंशी, दसरथ सूर्यवंशी,हणमंत येळीकर, भरत सूर्यवंशी, शाहूराज सूर्यवंशी,परमेश्वर जाधव, काशीम शेख,विक्रम सूर्यवंशी,अमोल सूर्यवंशी,श्रीनिवास श्रीमंगले,लक्ष्मण आकडे ,श्रीमंत सूर्यवंशी आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
मुस्लिम व मातंग बांधवांचा जाहीर पाठिंबा…
सकल मराठा समाजाच्या या साखळी उपोषण आंदोलनात गावातील मुस्लिम व मातंग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मराठा आरक्षण मागणीसाठी जाहीर पाठिंबा दर्शविला..