मौजे उमरगा हा येथे एकदिवसीय साखळी उपोषणाला महिलानी केली सुरुवात
निलंगा प्रतिनिधी..निलंगा तालुक्यातील मौजे उमरगा हा येथे मराठा आरक्षाणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण लढ्यात निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातून त्यांच्या अहवानाला प्रंचड प्रतिसाद मिळत आहे यांचाच भाग म्हणून मौजे उमरगा हा येथे 26.आँक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू आहे तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे सरकारने जरांगे पाटील यांना चाळीस दिवसाची मुदत मागीतली होती परंतु त्या दिवसापर्यंत राज्य सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी उपोषण करण्याचा निर्धार केला आहे या आंदोलनाला ग्रामीण भागातील आता महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी घेतले आहेत मौजे उमरगा हा ता निलंगा येथील साखळी उपोषणाला एकदिवसीय उपोषण करण्यासाठी महिला सरसावले आहेत या मध्ये गावातील सरपंच आशाबाई बिराजदार लताबाई हिरालाल लोभे कौशाबाई माधव हुपळे जयश्री भागवत राठोडे शोभाबाई बालाजी लोभे सत्यकला भास्कर लोभे प्रभावती वाडीकर शशिकला वाडीकर निर्मला अशोक बिराजदार लताबाई दिलीप लोभे सविताबाई जगदीश लोभे लक्ष्मीबाई गायकवाडे संगिता रमेश लोभे विद्याबाई निडबिने विश्रातबाई दिवे इत्यादी महिलांनी मराठा समाजाला आरक्षण शासनाने लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी त्या साखळी उपोषणाला बसले आहेत यांची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी असे मागणी या महिलांनी केली आहे
तालुक्यातील अनेक गावात राजकीय पुढार्यांना गाव बंदी चे बँनर लावून बंदी घालण्यात आली आहे तर १० गावात साखळी उपोषण सुरू आहे तालुक्यातील मौजे उमरगा हा येथील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून गावातील ओबीसी महिला देखील या उपोषणात सहभागी झाले आहेत आजपर्यंत मराठा समाजाने लहान घटकातील समाज बांधवांना कायम मदत केली आहे मराठा समाजाला न्याय लवकरात लवकर द्यावे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे हे भुमिका महिलानी केली आहे मराठा समाज आरक्षणाच्या मुख्ये प्रवाह पासून दुर असलेल्या मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळाले पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात गावातील सर्व महिला अमरण उपोषणाला बसणार आहोत असा निर्धार या महिलांनी केला आहे