ओबीसी आरक्षणासाठी लातुरात शिवा संघटनेच्या नेतृत्वात हिंदू लिंगायतांचा प्रचंड धडक मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
-शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात हजारो लिंगायतबांधव एकवटले
लातूर : हिंदू लिंगायत समाजातील 32 पोटजातींना ओबीसी, एसबीसी व एनटी आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटनेच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात व प्रांतसदस्य दत्ताभाऊ खंकरे यांच्या संयोजनात आज 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथील गंजगोलाईजवळील महादेव मंदिरापासून ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून हजारो लिंगायत बांधव सहभागी झाले होते. हिंदू लिंगायतांना आरक्षण देण्याबाबत घोषणा देत हा मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला . मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
हिंदू लिंगायत समाजातील 32 पोटजातींना ओबीसी, एसबीसी व एनटी आरक्षण मिळावे, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची संजिवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र भक्तीस्थळ अहमदपूर येेथे विकासासाठी 25 कोटींचा निधी तसेच श्री क्षेत्र कपिलधार मुख्य रस्त्याचा विकास करावा, मंगळवेढा येथे महात्मा बसेवश्वर यांचे राष्ट्रीय स्मारकाचे 65 एकर जमिनीवर त्वरीत काम सुरु करावे या इतर मागण्यांसाठीा आज शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेच्यावतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला. सरकारने लिंगायत समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेवून मागण्या मान्य कराव्यात, सरकार लिंगायतांना ओबीसी आरक्षण देवून इतरही मागण्या मान्य करील अशी आम्हाला आशा आहे, असे विचार प्रा. मनोहर धोंडे यांनी मोर्चासमोर भाषण करताना मांडले. तसेच हिंदु लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत शिवा वीरशैव संघटना लढा लढत राहिल. सरकारने मागण्या मान्य न केल्यास लढा तीव्र करू असा इशारा शिवा संघटनेचे प्रांत सदस्य दत्ताभाऊ खंकरे यांनी आपल्या भाषणातून दिला.
या प्रचंड धडक मोर्चात शिवा संघटनेचे प्रांत सदस्य दत्ता खंकरे, उमाकांतप्पा शेटे, आचार्य गुरुराज स्वामी, माजी आ. शिवशरण बिराजदार, प्रेरणाताई होनराव, भक्ती स्थळ ट्रस्टचे अध्यक्ष भगवंतराव चांभरगेकर, चंद्रकांत वैजापुरे, बसवराज पाटील कौळखेडकर, सुभाषअप्पा मुक्ता, उदगीर बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, ओम पुणे, विठ्ठल ताकबिडे, वैजनाथ तोनसुरे, संजय कोठाळे, सातलिंग स्वामी, लक्ष्मण विभुते, कल्पना बावगे, भीमाशंकर लखादिवे, पद्मीनबाई खराडे, विलास खिंडे, अंतेश्वर तोडकरी आदी सहभागी झाले होते.
ओबीसी आरक्षणासाठी लातुरात शिवा संघटनेच्या नेतृत्वात धडक मोर्चा
