निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीची आढावा बैठक संपन्न
निलंगा- निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या 68 गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती आखण्यासबंधी व मार्गदर्शक सूचना देण्यासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी पॅनल प्रमुख,आजी माजी सरपंच,व कार्यकर्त्याची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री सभागृह येथे संपन्न झाली.यावेळी आढावा बैठकीत बोलताना अशोकराव म्हणाले की,आपल्या गावाची निवडणूक ही स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विकासरुपी आधारावर व धर्मनिरपेक्षवादी विचाराने गावाच्या सर्वांगीण विकासासबंधी लढवावी.विरोधक तथा आमदार आपापल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करून स्वताची पोळी भाजण्याच काम करतील.कदाचित आम्ही एकच आहोत अशा पुड्या सोडून संभ्रम निर्माण करून काहींना पुड्या सोडण्यासाठी सांगतील.अशा पुड्याबहदरापासून सावध रहा. असे असले तर मी तुम्हाला बोलवलं असतो का..दादासाहेबांचा वारसा घेऊन मरेपर्यंत कायम राहणार आहे.यापुढे कार्यकर्त्यांना दमबाजी होत असेल अर्ध्यारात्री मला संपर्क करा.मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे ते आवर्जून म्हणाले. याच कार्यक्रमात निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 68 गावासाठी पक्षनिरीक्षकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या.मंचावर उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रदेश सचिव अभय साळुंके, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ, चक्रधर शेळके, निलंगा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, सुधाकर पाटील, समियोद्दीन देशमुख, देवदत्त पाटील, माधवराव पोळ, भीमराव पाटील, पंडितराव भदरगे ,सोनाजी कदम, रमेश मोगरगे, ज्ञानेश्वर पिंड, विकास पाटील, भगवान पाटील, राम धुमाळ, स्वरूप येळकर, एड.तिरुपती शिंदे इ सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे यांनी केले.