मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निलंगा तालुका येथील शिरोळ (वां.) येथे ग्रामस्थांचा वतीने साकळी उपोषण सुरु करण्यात आले अस्था आज #गिरकचाळ येथी सकल मराठा समाजानी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. उपोष्ण करत्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केली. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्याप्रमाणे राज्याच्या वेगवेगळ्या भागात तरुण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न संवेदनशीलतेने हाताळत त्वरित मार्गी लावणे आवश्यक आहे अशी भावना यावेळी गिरकचाळ येथील सकल मराठा समाजाने व्यक्त केली. यावेळी दोन्ही गावातली ग्रामास्त व युवा वर्ग मोठया संख्येने सहभागी होते.