आ. अभिमन्यू पवार यांनी घेेतली हासोरी खु. व हासोरी बु. गावासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्र्यांची भेट
निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील हासोरी खु व हासोरी बु या गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असून यासंदर्भात सातत्याने येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील टेंट उभारणीस ३ कोटी ५ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांची मागणी शेडची आहे. यासाठी ९५२ तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यासाठी १५ कोटी ४६ लक्ष रुपयांचा सुधारित प्रस्ताव १२ ऑक्टोबर रोजी सादर केला आहे.या संदर्भात पुन्हा दि.२७ रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन सदरील सुधारित प्रस्तावाला तातडीने निधीच्या तरतूदीसह प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली
मागच्या अनेक दिवसांपासून निलंगा तालुक्यातील हासोरी खु. व हासोरी बु. गावांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत असल्याने संकटकाळात नागरिकांना सुरक्षित आसरा घेता यावा यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे (शेड) उभारण्यात यावेत अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी १० ऑक्टोबर रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना केली होती. मा मंत्री महोदयांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी, लातूर यांनी हासोरी खु. व हासोरी बु. गावांमध्ये ९५२ तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यासाठी १५ कोटी ४६ लक्ष रुपयांचा सुधारित प्रस्ताव १२ ऑक्टोबर रोजी सादर केला आहे.या संदर्भात पुन्हा (दि.२७) रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन सदरील सुधारित प्रस्तावाला तातडीने निधीच्या तरतूदीसह प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले .