• Sat. May 3rd, 2025

मराठवाड्यात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत लातूर बाजार समिती प्रथम राज्य पणन संचानलयाकडून क्रमवारी जाहीर

Byjantaadmin

Oct 29, 2023
मराठवाड्यात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत लातूर बाजार समिती प्रथम राज्य पणन संचानलयाकडून क्रमवारी जाहीर
लातूर -बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत  राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन 2022-23 या आर्थिक वार्षिक कामगिरीच्या आधारावर क्रमवारी जाहीर करण्यात आली असून त्यात राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती मराठवाडा लातूर विभागातून प्रथम क्रमांकावर तर राज्यात 16 व्या क्रमांकावर आलेली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख राज्याचे माजी वैधकिय शिक्षण मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली  लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत असून जागतिक बँकेच्या सहकार्याने बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय स्मार्ट प्रकल्प सुरु आहेत बाजार समितीच्या क्रमवारी निश्चित करण्यासाठी राज्य पणन संचानलय यांच्याकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत पायाभूत सुधारणा इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज विविध योजना /उपक्रम राबवण्यातील सहभाग त्यानुसार एकूण 35निकष तयार करण्यात आले होते त्यात जिल्हा व तालुका स्तरीय समितीने तपासणी केली होती एकूण 200 गुनापैकी 139गुण मिळवले आहेत लातूर विभागात  लातूर धाराशिव बीड   नांदेड  या 4 जिल्ह्याचा समावेश असून 48 बाजार समित्या आहेत या गुणांच्या आधारावर राज्यात 16 वा क्रमांक तर लातूर मराठवाडा विभागात  लातूर बाजार समिती पहिल्या स्थानावर आलेली आहे
लातूर बाजार समितीने योजना राबवून शेतकर्याना सुविधा उपलब्ध करून दिल्या सभापति जगदीश बावणे यांची माहिती
बाजार समितीने आवारात शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या तसेच आर्थिक कामकाज, विविध योजना राबवून शेतकऱ्यांना  सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा सहभाग नोंदवला होता आदींची माहिती जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली होती त्यानुसार पणन संचालनालय विभागाकडून मराठवाड्यात लातूर विभागात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत प्रथम तर राज्यात 16 व्यां क्रमांकावर आलेली आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी सांगितले
 दोन वर्षापासून होतेय क्रमवारी जाहिर
स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत राज्यात दोन वर्षापासून अशा प्रकारे बाजार समितीची क्रमवारी जाहीर होत असून यामुळे इतर बाजार समितीच्या तुलनेत शेतकरी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकर्याना समजणार आहे तसेच यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण होण्यास चालना मिळणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सचिव बी डी दुधाटे,सहाय्यक सचिव सतीश भोसले सहाय्यक सचिव भास्कर शिंदे यांनी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *