विघ्नहर्ता प्रतिष्ठानद्वारे आयोजित निलंग्यात सर्वधर्मीय ‘नवरात्र दांडिया महोत्सव’संपन्न
निलंगा: विघ्नहर्ता प्रतिष्ठानद्वारे ऑर्किड अकॅडमी व महाराष्ट्र इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच माजी नगराध्यक्षा सुनीताताई दयानंद चोपणे,डॉ.राखी पंकज शेळके या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दांडिया रास हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी पालक,युवती व शहरातील महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी व विविध कलावंत या कार्यक्रमास सहभाग नोंदवून निलंगा शहरांमध्ये पहिल्यांदाच गुजरात मुंबईच्या धर्तीवर हा कार्यक्रम घेण्यात आला.विशेष म्हणजे या दांडिया महोत्सवामध्ये समाजातील सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी झाल्यामुळे या दांडिया कार्यक्रमाला राष्ट्रिय एकात्मतेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले.तसेच पाल्याबरोबर पालकांनी सुद्धा संगीताच्या तालावर ठेका धरला व पालक,आजोबा यांनी पण नाती-नातवंडासोबत मनसोक्त आनंद घेतला.सदरील परिसर हा आपण कुठेतरी मोठ्या शहरात असल्याचं वातावरण या ठिकाणी पहावयास मिळाले. यावेळी माध्यमांशी बोलताना या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाल्या की, आपला भारत देश विविधतेने व एकात्मतेने नटलेला असून आपली भारतीय संस्कृती जतन करण्यासाठीच असे विविध कार्यक्रम घेत असतो.या संस्थेविषयी माहिती सांगताना त्या म्हणाल्या म्हणाल्या की, आमची ऑर्किड सीबीएससी इंग्रजी माध्यम ही शाळा आम्ही २००७-०८ या कालावधीमध्ये सुरू केली या शाळेचा वाढता आलेख पाहता आज शाळेची विद्यार्थी पटसंख्या ९०० च्या वरी गेली असून लवकरच नर्सरी ते पीजी पर्यंत शिक्षण देण्यासाठी विकासरत्न डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर वरिष्ठ महाविद्यालय सुरू होत असून त्यामध्ये बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी व स्पोर्ट अकॅडमी तसेच नर्सिंग कॉलेज या शाखा सुरू होत असून सदरील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह व अत्याधुनिक ग्रंथालय सुरू करणार असल्याचे त्या म्हणाल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्या सिद्दीकी मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक अभिषेक गुप्ता सर, दिपाली नाईक मॅडम, प्रतिभा ढगे मॅडम,राणी बाहेती, सुवर्णा हिरास,उमाली माने, सुप्रिया पवार,शुभांगी सोळुंके,राजा पवार,राहुल ढगे कुलकर्णी सर,वैशाली घाडगे स्नेहा मॅडम आत्माराम कांबळे व मनोज कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले तर आभार अमोल सोनकांबळे सर यांनी मानले.