दसऱ्याच्या नवमी दिवशी राठोडा शिवारात महानुभव पंथाचे विजनवास करून वनभोजन
केळगाव:- निलंगा तालुक्यातील राठोडा येथे आज महानुभव पंथ समाजाच्या वतीने आज महानवमीच्या दिवशी गावाबाहेर जाऊन शेतशिवरात वास्तव्या करून विजनवास साजरा करण्यात आला व वणभोजन करण्यात आले या पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घालून दिलेल्या धर्म नियमांनुसार महानवमीच्या काळात सर्वजण शेतात वनात गावाबाहेर असतात कारण आजच्या दिवशी गावात रूढी परंपरेनुसार देवदिविस बळी अर्पण केली जाते म्हणून निरहंसक झालं पाहिजे म्हणून चक्रधर स्वामी यांच्या तत्वाचे पालन करत विजनवास करून लिळाचरीत्र या ग्रंथाचे पठण श्रवण करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करून दंडवत घालण्यात आले यावेळी गावातील महिला पुरुष बालके उपस्थित होते. आज गावात गावच्यां पूर्व व पश्चिम भागात राठोडा मोड येथे गोपाळ शिंदे यांच्या शेतशिवरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी महंत कुरेकर बाबा महानुभव ,विश्वनाथ बाबा महानुभव यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अतुल शिंदे सर,डॉ राजे सर, शिवाजी सोमवंशी सह ग्रामस्थ व निलंगा तालुक्यातून आलेले महानुभव पंथ समाजबांधव उपस्थित होते.