निलंगा – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि.३० ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात – सकल मराठा समाज निलंगा तालुक्यातील मराठा बांधवांचा निर्धार.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण लढ्यात निलंगा तालुक्यातील तमाम मराठा बांधवांनी ताकतीने त्यांच्यापाठिशी उभे राहण्याचा आज संकल्प घेण्यात आला,सकल मराठा समाज निलंगा च्या वतीने आज शासकीय विश्रामगृह निलंगा येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे तसेच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासाठी गेली 45 दिवस झाले आंदोलन उपोषण करत आहेत सरकारने मराठा समाजाला चाळीस दिवसात आरक्षण देतो असा शब्द दिला होता पण तो शब्द मुख्यमंत्री महोदय यांनी पाळला नसल्यामुळे माघील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत त्यास पाठींबा म्हणून निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
सध्या निलंगा तालुक्यातील ७० पेक्षा अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे तसेच ८ गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे गावागावात साखळी उपोषण सुरू करणे तसेच प्रत्येक गावात सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करणे.उपोषण स्थळी कोणत्याही सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट देऊ नये कोणत्याही राजकीय पक्षांनी निलंगा तालुक्यात राजकीय कार्यक्रम आयोजित करू नये,अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.असे ठराव बैठकीत घेण्यात आले.यावेळी निलंगा शहरातील व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते