लातूर – लाईनस्टाफ कर्मचाऱ्यावर दिवसेंदिवस वाढत चाललेला अन्याय, अत्याचार,मानहानी त्यामुळे लाईनस्टाफची ढासळत चाललेली मानसिकता त्यातून निर्माण झालेला उद्रेक व त्यांच्या विविध मागण्या मागत महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने महावितरण लातूर परिमंडळ कार्यालया समोर दुपारी कृती समितीच्या माध्यमातून विज तांत्रिक कर्मचारी एकवटले होते.वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्याने परिसर दणाणून सोडला होता.”एकच मिशन स्वतंत्र वेतन”या मागणीच्या घोषणा देत विज तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपला असंतोष दाखवला.लाईनस्टाफ ला स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी.वर्ग ४ मधील लाईनस्टाफची शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन वर्ग ३ मध्ये वर्गीकरण करण्यात यावे,लाईनस्टाफ च्या कामाचे तास व स्वरूप निश्चित करावे,पेट्रोल भत्ता २० लिटर देण्यात यावा,वीजबिल वसुलीचे काम सांघिक स्वरूपाचे असल्यामुळे जबाबदारी निश्चित करावी.सुरक्षा साधने पुरवण्यात यावीत या व अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने २६/१०/२०२३ रोजी दुपारी ही द्वारसभा घेण्यात आली.या द्वारसभेला कामगार नेते अनिल पुरी,प्रमोद कांबळे,नवनाथ मोरे,सुनील फुंदे,रविंद्र घोडके,महादेव पाटील,रवी पांचाळ आदींनी संबोधित केले यावेळी लाला सय्यद,राम वाडकर, सतिश गिरी,ईश्वर देशमुख, रवी पांचाळ,अमोल डाके,संतोष झुंबरे,सुभाष मुसळे,अनिल सूर्यवंशी, फिरोज चुडीवाले,पी.एस.सूर्यवंशी, तुकाराम अकिले,किशोर पवार, महादेव सूर्यवंशी,चेतन नागापुरे, खैरात शेख,लक्ष्मण दहिफळे,राम जाधव,सचिन गिरी,सचिन सूर्यवंशी श्रीमती भाग्यश्री वाघमारे,अश्विनी क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची या द्वारसभेला प्रमुख उपस्थिती होती.