माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांन लातूर शहरातील अग्रवाल कुटुंबियांचे सांत्वन करून दिला धीर
लातूर प्रतिनिधी : लातूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक हनुमान खांडसरीचे व्यवस्थापक लक्ष्मीनिवासजी (पप्पू शेठ) अग्रवाल यांचे नुकतेच निधन झाले आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी लातूर शहरातील अग्रवाल कुटुंबीयांच्या शांती निवासस्थानी जाऊन अग्रवाल कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले, त्यांना धीर दिला.
यावेळी माजी नगरसेविका शांतादेवी अग्रवाल, रामनिवास अग्रवाल, सुमित अग्रवाल अशोक (गट्टूशेठ) अग्रवाल, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे आदिसह अग्रवाल कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.