• Wed. Jun 18th, 2025

विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसीला उपविजेतेपद 

Byjantaadmin

Oct 27, 2023
विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसीला उपविजेतेपद
   लातूर/प्रतिनिधी:डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आयोजित सोलापूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत कोळपा येथील एमडीए स्कुल ऑफ फार्मसीच्या विद्यार्थीनींनी उपविजेतेपद पटकावले.
    व्हीडीएफ इंजिनीरिंग महाविद्यालय यांच्या वतीने श्रीमती सुशिलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय,लातूर येथे या स्पर्धा पार पडल्या. बॅडमिंटन स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसी कोळपा विभागा तर्फे ऋतूजा शिंदे,दिप्ती वेदपाठक,वैष्णवी सुळे, मुस्कान शेख,श्रुती चेवले,प्रीती दरोडे या विद्यार्थीनीनी सहभाग नोंदवला.खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन दाखवत उपविजेते पदक प्राप्त करून महाविद्यालयाचा सन्मान वाढवला.
 या यशाबद्दल संस्थेचे संचालक दिनेश आंबेकर, यशवंत आंबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य रवि कुऱ्हाडे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *