• Sun. Jun 15th, 2025

फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या मुलांची

Byjantaadmin

Oct 27, 2023

फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या मुलांची

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन प्रकृतीची केली चौकशी

लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागात फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या मुलांची आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट घेतली. प्रकृतीची चौकशी करून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली, सर्व जखमींवर काळजीपूर्वक उपचार करण्याच्या सूचना अधिष्ठाता व त्यांच्या सहकारी डॉक्टरांना दिल्या आहेत. सदरील दुर्दैवी घटना घडल्यापासून आपण डॉक्टरांच्या संपर्कात असून सर्वांवर चांगले उपचार सुरू
आहेत, असे सांगून जखमी मुलांच्या पालकांना त्यांनी धीर दिला. यावेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर समीर जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन जाधव, भुलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर शैलेंद्र चव्हाण आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *