• Sun. Jun 15th, 2025

६५०० विद्यार्थ्यांनी घेतला चित्र रेखाटण्याचा आनंद

Byjantaadmin

Oct 27, 2023
६५०० विद्यार्थ्यांनी घेतला चित्र रेखाटण्याचा आनंद
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या स्पर्धेत १२० शाळांचा सहभाग
   लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब लातूर मिडटाऊन, चापसी सायकल मार्ट व श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने कै.कांतीलालजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत १२० शाळांमधील ६५००  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेचे हे २९ वे वर्ष होते.
   श्रीकिशन सोमाणी विद्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते.इयत्ता पहिली ते चौथी,पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत विजेत्यांना चापसी सायकल वर्ल्ड यांच्याकडून बक्षिस म्हणून सायकल देण्यात येणार आहेत.प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्यास एक व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे दोन अशा एकूण १२ सायकल देण्यात येणार असून लवकरच पारितोषिक वितरण होणार आहे.
    या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह रोटरीचे पब्लिक इमेज डायरेक्टर अभय राजे,डॉ.दादासाहेब करंजुले,पुनम देवदास, उज्वला राजे,चापसी सायकल मार्टचे नितीन चापसी,रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन चेतन पंढरीकर, अमोल दाडगे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रवींद्र बनकर,सचिव अविनाश भोसले,किशोर दाताळ, डॉ.राजगोपाल तापडिया,शशिकांत मोरलावार व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *