मराठ समाज बांधवाच्या भावनांशी आपण एकरूप
मराठा समाजाला कायदयाच्या कसोटीवर टीकणारे आरक्षण मिळावे म्हणून आपण प्रयत्नशील राहणार-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : २४.१०.२३आरक्षणा संदर्भातील मराठा समाजांच्या भावनांशी आपण एकरूप आहोत केंद्र आणि राज्यसरकारने मराठा समाजाला विनावीलंब कायदयाच्या कसोटीवर टिकाणारे आरक्षण दयावे या मागणीला आपला व काँग्रेस पक्षाचा पाठींबा असून या मागणीच्या मंजूरीसाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही,
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली. रेणा सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन व १८ व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी जात असताना रेणापूर तालुक्यातील निवाडा फाटा येथे ,सकल मराठा समाज आंदोलकांशी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्रंबक भिसे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, मराठा समाज बांधव उपस्थित होते. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यावेळी म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे पक्षाच्या वतीने अधिकृत भुमिका मांडत असून त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठींबा जाहीर केलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात पहीले पाऊल उचलले होते, त्यांनी या संदर्भात आयोगही नेमला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णही घेतला होता. त्यावेळी त्यांच्या मंत्रीमंडळात मी राज्यमंत्री होतो. . या आंदोलनाला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. या आंदोलनाला जेव्हा जेव्हा लोकसभेत विधानसभेत गरज असेल तेव्हा काँग्रेस पक्षाने पाठींबा संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. या आरक्षणाला पूरक ठरणारी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधींनी व्यक्त केली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र लवकर देण्याच्या मागणीचा आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. विजयादशमीच्या निमित्ताने मराठा समाजाचे आंदोलन यशस्वी ठरावे अशा शुभेच्छा दिल्या