साखर उद्योगात रेणा साखर कारखाना सदैव अग्रेसर
रेणा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर व गळीत हंगामाचा झाला विजयादशमी शानदार शुभारंभ-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
रेणापूर दिलीपनगर-रेणा सहकारी साखर कारखान्याचा १८ वा गळीत हंगाम २०२३- २४ चा बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैधकिय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार त्र्यंबक भिसे, संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, मांजराचे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे, २१शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा चे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, संत शिरोमणीचे उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके, लातूर जिल्हा बँकेच्या संचालीका सौ. स्वयंप्रभा पाटील, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास, चंद्रकांत सुर्यवंशी, संग्राम माटेकर, प्रविण पाटील, तानाजी कांबळे, शहाजी हाके, संभाजी रेड्डी, सौ.वैशालीताई माने, अमृताताई देशमुख,लालासाहेब चव्हाण,अनिल कुटवाड,कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाध्व साहेब, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडीतराव देसाई, विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सौ. वनमाला आबासाहेब पाटील यांच्यासह रेणापूर बाजार समितीचे संचालक, पदाधिकारी शेतकरी मोठया संख्येने उपस्थिती होते कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी करताना कारखान्याने आज पर्यंत केलेल्या प्रगती बाबतची पुर्ण माहीती यावेळी दिली व येणारा गळीत हंगाम 2023-24 चांगल्या प्रकारे केले जाईल व गाळपास येणाऱ्या ऊसाला जास्तीत जास्त भाव दिला जाईल असेही यावेळी बोलताना सांगीतले
रेणा साखर कारखान्याकडून लवकरच सौर ऊर्जा सी एन जी प्रकल्प कार्यान्वित होणार-सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख
यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की, रेणा सहकारी साखर कारखाना हा अल्पावधीतच राज्यातील साखर उद्योगात लौकीक प्राप्त करून अग्रेसर राहीला असून लवकरच रेणा कारखाना येथे सौरउर्जा प्रकल्प व सीएनजी प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याचे सांगून,रेणाने साखर उद्योगात जे यश मिळवलं ते कायम टिकवून ठेवले आहे, रेणाचा चालू गळीत यशस्वी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभासाठी कारखान्याच्या पाच विभागातून प्रथम आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कारखान्याचे संचालक धनराज देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक होम हवन व गव्हाण पुजन संपन्न झाले. सुत्रसंचलन कारखान्याचे संचालक अनिल कुटवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांनी केले यावेळी उस उत्पादक शेतकरी सभासद मांजरा साखर परिवारातील विवीध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
|