• Wed. Apr 30th, 2025

दारू बंदीसाठी महिलांचा निवडणुकीवर बहिष्कार

Byjantaadmin

Nov 22, 2022

दारुबंदीसाठी महिलांचा निवडणुकीवर बहिष्कार

शिवणी कोतल : एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना मात्र शिवणी (को) येथील महिलांनी प्रशासनाने अवैध दारू विक्री बंद करावी व लेखी आश्वासन द्यावे अन्यथा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
निलंगा तालुक्यातील शिवणी कोतलमध्ये अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट असून किराणा दुकानापेक्षाही अधिक अवैध दारूची दुकाने आहेत. तेव्हा पण राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाकडुन याकडे जाणून बुजून डोळेझाक होताना दिसत आहे. विशेष शाळेलगत दोनशे मीटरच्या आत मद्यपान करण्यास व विकण्यास बंदी असतानाही शाळेलगतच दोन ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. कारण दारूविक्रेते म्हणतात आमची दारू विक्री कोणीही बंद करू शकणार नाही. आम्ही संबधीतांना हप्ते देतो. नेमके हप्ते घेणारे कोण? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. तसेच आजपर्यंत अनेक निवेदने ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. एक वेळा ग्रामपंचायतमार्फत अवैध दारू विक्री करणा-या व्यक्तीस पकडून पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले होते पण पोलीस प्रशासनाकडून दारू विक्री करणा-याना पकडणे व अवैध दारू विक्री बंद करणे हा अधिकार आमचा नसून तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी, अशी उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यानंतर मात्र अधिक उघड दारू विक्री करण्यास सुरूवात झाली. दारू विक्रेत्यांना मात्र त्या नंतर पाठबळ मिळाल्या सारखेच झाले आहे.भर वस्ती मध्येच दारू विक्री होत असल्याने मद्यपी त्याच ठिकाणी मध्यपान करून त्याच ठिकाणी राहणा-या नागरिकांना शिवीगाळ करतात या मुळे भाडणे होण्याचेही प्रकार अधिक वाढलेले आहेत. विशेष विद्यार्थी, शाळकरी मुली व महिलांना याचा नाहक त्रास अधिक होत आहे. दिवसभर त्रास असतोच पण सध्याकाळच्या वेळी अधिकचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. रात्रभर शिवीगाळ भाडणे होत असल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण असून आमच्यासोबत वाईट काही घडले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. विशेष गावातच दारू भेटत असल्याने दारू पिणा-यामध्ये काही शाळकरी चौदा-पधरा वर्षाची मुलेही वाईट व्यसनात अडकले आहेत. कारण सभोवतालील वातावरण तसे झाल्यांने नवी पिढीही वाईट व्यसनात अडकली आहे. ही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. त्या मुळे महिलांनी व ग्रामस्थांंनी निवडणुकीवर बहिष्कार घालु असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed