निलंगा महाविकासआघाडीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध
निलंगा-निलंगा महाविकास आघाडीच्या व सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल महाराष्ट्राचे व अखंड भारताचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप चे प्रवक्ते व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एकेरी उल्लेख करून अवमानित केले.व तमाम शिवप्रेमी भक्ताच्या भावना दुखावल्या.याचा जाहीर निषेध जोडो मारो आंदोलन करून करण्यात आला.तर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धभिषेक करून पवित्र करण्यात आले.भगत सिंग कोशारी व सुधान्शु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने एकत्र येऊन तीव्र शब्दात घोषणा देऊन प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून दहन करण्यात आले.यावेळी माजी जि. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,माजी सभापती अजित माने,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष इस्माईल लदाफ,शिवसेना मा.तालुका प्रमुख ईश्वर पाटील,उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे,युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे,युवा सेना जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब सौदागर,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुधाकर पाटील,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम,माजी नगरसेवक सिराज देशमुख,टिपू सुलतान संघटनेचे सबदर कादरी, शिवसेना तालुका उपप्रमुख मुस्तफा शेख, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सुर्यवंशी,लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी,देवदत्त सूर्यवंशी,गणराज्य संघाचे रामलिंग पटसाळगे,रोहन सुरवसे,अजय कांबळे,आकाश सुरवसे,मैनिद्दीन मणियार,गंगाधर चव्हाण,तुराब बागवान,माधवराव पाटील,आवेझ शेख, यांच्यासह महाविकास आघाडीचे महिला व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.