जगदीश कोरे यांची राज्य उत्पादन शुल्क उपपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला सत्कार
शिरुर अनंतपाळ :-शहरातील सुपुत्र जगदीश विजयकुमार कोरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकावर ऊत्तीर्ण झाला असुन त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल शहरवाशियाकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिरुर अनंतपाळ येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार माणिक कोरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र जगदीश कोरे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रशाला शिरुर अनंतपाळ येथे व माध्यमिक शिक्षण अनंतपाळ नुतन विद्यालया,शिरुर अनंतपाळ येथे अभियंत्रीकी पदवी पुणे येथुन संपादीत केल्यानंतर जिद्द,चिकाटी,सातत्य,परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकावर ऊत्तीर्ण झाला असुन त्यांची राज्य ऊत्पादन शुल्क विभागाच्या ऊपनिरीक्षकपदी निवड झाली असुन जगदीश व आईवडीलांचा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडुन ग्रामदैवत अनंतपाळ प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन शुभकामना देण्यात आल्या..
यावेळी नगरसेवक. सुधीर लखनगावे,संतोष शिवणे,अनंत काळे,जयश्री आवाळे, रागिणी शिवणे,श्रीदेवी संभाळे,कुसुम खरटमोल यांच्यासह वडील. विजयकुमार कोरे, आई. शकुंतला कोरे आदी ऊपस्थीत होते.