पांडुरंग महाराज वडगावकर यांचे दुखद निधन भावपूर्ण श्रध्दांजली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन्मानित पांडुरंग महाराज वडगावकर यांचे निधन निराधारांचा आधार गेला
निलंगा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पांडुरंग महाराज वडगावकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले आहे.अंत्यविधी दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता त्यांचे मुळ गाव निलंगा तालुक्यातील वडगाव येथे सार्वजनिक स्मशानभूमित होणार आहे.
विविध सामाजिक चळवळीत काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या दलित मिञ पुरस्काराने त्याना सन्मानित करण्यात आले होते.लातूर जिल्हा निराधार संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यानी अनेक वर्षे काम केले असून समाजातील वंचित उपेक्षित विधवा परितक्त्या याना न्याय मिळवून देण्यासाठी जीवनभर त्यानी कार्य केले आहे.त्याच बरोबर सरकार दरबारी न्याय मागणीसाठी रास्तारोको,अमरण उपोषण,लाक्षणिक उपोषण,आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.पांडुरंग महाराज वडगावकर यानी जाती धर्माच्या पलिकडे जाऊन योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी त्यांची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे.त्यामुळे वडगावकर महाराज सर्वासाठी आपले वाटायचे त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम होणार अशी गोरगरीबाना खाञी वाटायची निर्व्यसनी निस्वार्थी गरीबा बद्दल अत्मीयता प्रेम असल्यामुळे निलंगा तालुक्यात तहसिल पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये नैतिक छाप होती. त्यांच्या पश्चात तीने मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे.