सोशसमध्येही स्पेशल भक्तांसाठी सफरचंद व संत्री वाटप
लातूर : तुळजापूर पायी वारी करणाऱ्या भक्तांसाठी सर्वोत्तम सोशल टिम लातूर च्या वतीने सफरचंद व संत्री वाटप करुन आपल्या वेगळेपणाची चुनूक दाखवली.
तुळजापूर पायी जाणाऱ्या भक्तांसाठी जागोजागी वेगवेगळ्या प्रकारची खाद्यपदार्थाची रेलचेल दिसून येते पण सर्वोत्तम चॕरिटेबल ट्रस्ट अंतर्गत सोशल टिम ने सफरचंद व संत्री वाटप केले. ही टिम वर्षभर सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असते. गुडीपाडवा शाळेचा पट वाढवा, दिपावलीची पहाट गरीबाच्या दारात, सर्वोत्तम दान रक्तदान , थंडीच्या रात्री मायेची शॉल अशा अनंत प्राकारच्या सोशल कार्यात ही टिम वर्षभर स्वखर्चाने सहभागी होते. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी तुळजाईच्या भक्तांसाठी फळांची रास वाटून परडी भरली. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यासाठी सोशल टिम चे अध्यक्ष उत्तम शेळके , सुरेश नागलगावे, प्रदिप ढेंकरे , राजकूमार अग्रवाल, उद्धव कांबळे सिद्रामअप्पा चाकोते, प्रल्हाद ढवळे , सोमनाथ घटकार, ज्योती जगदाळे, वनमाला मसलकर , हिरा हेंडगे यांनी विशेष प्रयत्न केले. या सत्कार्याला रंजना चव्हाण , तृप्ती आंदुरे, रंजना जगताप, जीवनकला जाधव, सिमा देशमुख , सुनीता सरवडे, दत्ता दापके , सचिन आहेरकर , खय्युम सय्यद , योगेश सांडूर , विठ्ठल महानुरे, हानमंत सरवडे, सचिन सावळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.