दोनशे दृष्टीहिन व्यक्तीना किराणा ,अन्नधान्याचे किट वाटप
आक्का फाँडेशनची दिवाळी भेट
निलंगा/प्रतिनिधी
जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त आक्का फाँडेशनच्या वतीने दोनशे अंध व्यक्तीना अन्न धान्यासह किराणा मालाचे किट व पांढरी काठी वाटप करण्यात आले आहे.
निलंगा तालुक्यातील दोनशे पेक्षा जास्त असलेल्या नोंदणीकृत दृष्टीहिन अंध व्यक्तीना दिनांक २२ रोजी जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त शहरातील शिवाजी विद्यालयात पांढरी काठी व अन्नधान्यासह किराणा मालाचे किट माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून आक्का फाँडेशनच्या वतीने वाटप करण्यात आले आहेत.दृष्टीहिन अंध व्यक्तीना दिवाळी भेट दिल्याने आक्का फाँडेशन व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे दृष्टीहिन संघटनेचे महासचिव धनाजी व्हणे यानी आभार व्यक्त केले आहेत.
निलंगा तालुक्यातील आतापर्यंत अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून १२६९ नागरिकांचे नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत तर ९५६६ लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहेत.सामाजिक कार्यात नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या आक्का फाँडेशनच्या वतीने शहरासह तालुक्यातील दृष्टीहिन अंध व्यक्तीना अन्नधान्यासह किराणा मालाचे किट वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली आहे.
या कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,दृष्टीहिन महासंघाचे सचिव धनाजी व्हणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे,सोलापुरे अप्पा यांच्यासह दृष्टीहिन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.